Ad will apear here
Next
निवेदिता प्रतिष्ठानतर्फे इको-फ्रेंडली गुढीची निर्मिती
दापोली : गुढीपाडव्यानिमित्त दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठानतर्फे पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) गुढीची निर्मिती करण्यात आली आहे. गुढी उभारण्यासाठी दर वर्षी बांबूची मोठ्या प्रमाणावर तोड केली जाते. हे प्रमाण कमी व्हावे यासाठी या वर्षी पर्यावरणपूरक गुढीचा लक्षवेधी प्रकल्प ‘निवेदिता’मार्फत हाती घेण्यात आला आहे.  

ही गुढी तयार करताना वेटलेस्ट प्लास्टिक कचरा आणि वेस्ट बिल्डिंग मटेरियलचा प्रामुख्याने वापर करण्यात आला आहे. यातील प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करण्यात आला आहे. या गुढीसोबत पाट, ओले अष्टगंध, लोटी, शेला, अशा सर्व पूजा साहित्याने सज्ज असलेला बॉक्स संस्थेने ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर पाचशे रुपयांत उपलब्ध केला आहे. आपली वसुंधरा प्लास्टिक कचरामुक्त बनावी या उद्देशाने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.  

गुढीसाठी संपर्क क्रमांक : ९८२०४ २८२१२, ९५६११ ४२०७८.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZWFBY
Similar Posts
धम्माल शिबिरात मुलांनी अनुभवली बिनभिंतीची शाळा दापोली : तालुक्यातील जालगाव येथील निवेदिता प्रतिष्ठानतर्फे दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्रपालीच्या आमराईत दोन दिवसीय धम्माल शिबिर घेण्यात आले. या शिबिरात मुलांनी वेगवेगळ्या विषयांची माहिती घेऊन बिनभिंतीच्या शाळेचा अनुभव घेतला.
कचरा नव्हे, ही तर संपत्ती! रत्नागिरी : कचऱ्याचा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे उग्र रूप धारण करतो आहे. त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली न जाणे हे त्यामागचे कारण; पण बहुतांश प्रकारच्या कचऱ्याचा पुनर्वापर करता येतो. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील निवेदिता प्रतिष्ठानने हे स्वतःच्या प्रयोगांतून सिद्ध केले आहे. त्यांनी
नव्या पिढीने गिरवले जलसाक्षरतेचे धडे दापोली : रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील निवेदिता प्रतिष्ठानने बालदोस्तांसाठी नुकतेच धम्माल शिबिर आयोजित केले होते. यात केवळ धमाल न करता प्रतिष्ठानतर्फे देशाच्या या भावी जबाबदार नागरिकांना जलसाक्षरतेचे धडे देण्यात आले. पाणी हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन किती
आयआयटी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत हिरेन बावस्कर देशात चौथा दापोली : नेरूळ (नवी मुंबई) येथील डीएव्ही पब्लिक स्कूलच्या विज्ञान शाखेचा (सीबीएसई) विद्यार्थी हिरेन बावस्कर याने नुकत्याच झालेल्या आयआयटी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत आरक्षित वर्गात महाराष्ट्रात प्रथम, तर देशात चौथा क्रमांक पटकावून यश संपादन केले आहे. उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतही त्याने ९७ टक्के गुण मिळविले आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language